लढाई अजून संपलेली नाही! विधानसभेबाबत आदित्य ठाकरे यांचे सूतोवाच

लढाई अजून संपलेली नाही! विधानसभेबाबत आदित्य ठाकरे यांचे सूतोवाच

या देशात अहंकाराला थारा नाही. लोकशाही आणि राज्यघटना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न इथल्या जनतेने हाणून पाडला आहे. पण अजून लढाई संपलेली नाही. हेच चित्र यंदा पुन्हा पाहायला मिळणार आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभेविषयी सूतोवाच केलं आहे.

एक्स पोस्टवर आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या अहंकारी वृत्तीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, संसदेच्या प्रांगणातले महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आले आहेत. हे अतिशय वाईट आहे. भाजपच्या संविधान बदलण्याचे आणि लोकशाही संपवण्याचे मनसुबे देशातील मतदारांनी उधळून लावले आहेत. मतदारांनी भाजपच्या हुकूमशाही वृत्तीला, संविधानाला बदलून आपल्या पक्षाचे नियम लागू करण्याला, अहंकाराला नकार दिला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातही भाजपने ज्या प्रकारे राज्याची लूट केली आणि राज्याचं आर्थिक बळ कमी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच मतदारांनी भाजपला त्याची जागा दाखवून दिली. आज देशाच्या मतदार, कार्यकर्त्यांच्या मदतीने आपण आपलं संविधान, लोकशाही वाचवण्यात यशस्वी ठरलो आहोत. पण, ही लढाई अजून संपलेली नाही. यंदा पुन्हा हेच चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि संपूर्ण विजय मिळवल्याशिवाय आपण अजिबात थांबायचं नाहीये, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;