प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात बिनधास्त घुसून प्रचंड मोठी चोरी, रोकड आणि दागिने पळवले; खळबळ
नुकताच एका अभिनेत्रीच्या घरी चोरी करण्यात आल्याचा हैराण करणारा प्रकार उघडकीस आलाय. आता या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलीये. पोलिस या प्रकरणातील तपास करत आहेत. मात्र, या चोरीनंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय. अभिनेत्रीच्या घरी मोठी घरफोडी झालीये. अभिनेत्री आणि निर्माता श्वेता शिंदे हिच्या घरी ही चोरी करण्यात आलीये. श्वेताच्या साताऱ्यातील घरात मोठी चोरी झाली. अभिनेत्री तिच्या आईसोबत साताऱ्यात राहते. ज्यावेळी ही चोरी करण्यात आली, त्यावेळी तिच्या घरात कोणीही उपस्थित नव्हते.
श्वेता शिंदे ही कामानिमित्त मुंबईला आली होती. त्यादरम्यानच ही चोरीची घटना घडलीये. 3 जून 2024 रोजी श्वेता शिंदेच्या घरी चोरी झालीये. दहा तोळ्यांचे दागिने चोरांनी लंपास केले आहेत. सातारा शहरातील पिरवाडी परिसरात श्वेता शिंदे हिचे घर असून तिच्या याच घरात चोरीची घटना घडलीये. यासोबत चोरांनी पैसेही लंपास केल्याचे कळतंय.
याबद्दल बोलताना श्वेता शिंदे म्हणाली की, ज्यावेळी चोरी झाली, तेंव्हा मी मुंबईला गेले होते. सुदैव चांगले की, त्यावेळी माझी आई घरात नव्हती. नेमके किती पैसे चोरीला गेले, हे सांगणे अवघड असल्याचेही श्वेता शिंदे हिने म्हटले. मी एक नागरिक म्हणून पोलिसांकडे तक्रार करण्याचे काम केले आहे. बाकी आता जबाबदारी ही पोलिसांची आहे.
ते चांगले काम करतील, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीये. या सगळ्या घटनेनंतर नक्कीच काहीतरी चांगले निघेल. काहीतरी निष्कर्ष निघेल. मला तशी अपेक्षा आहे. या चोरी प्रकरणात अजून पोलिसांकडून तसा काही खुलासा करण्यात नाही आला. मात्र, या चोरीनंतर मोठी खळबळ परिसरात बघायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी देखील मोठी चोरी करण्यात आली. यानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. दहा लाखांची चोरी पुष्कर श्रोत्रीच्या घरी करण्यात आली. पुष्कर श्रोत्रीच्या घरी काम करणाऱ्याच एका महिलेने ही चोरी केली होती. आता श्वेता शिंदेच्या प्रकरणात काय खुलासे होतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List