मुलीच्या जन्मानंतर वरुण धवनच्या पत्नीची प्रकृती कशी? सासरे म्हणाले, नताशा..

मुलीच्या जन्मानंतर वरुण धवनच्या पत्नीची प्रकृती कशी? सासरे म्हणाले, नताशा..

वरुण धवन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. वरुण धवन याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच वरुण धवन याचा बवाल हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात वरुण धवन याच्यासोबत जान्हवी कपूर ही मुख्य भूमिकेत दिसली. वरुण धवन हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतोय. वरुण धवन याची पत्नी नताशा दलालने 3 जून 2024 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला.

काही दिवसांपूर्वीच वरुण धवन याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत लवकरच आयुष्यात बाळाचे आगमन होणार असल्याचे सांगितले. आता नुकताच वरुण धवन याने पत्नी नताशा दलाल आणि बाळाच्या तब्येतीबद्दल मोठे अपडेट शेअर केले आहे. नताशा दलाल आणि बाळ अजूनही रूग्णालयातच आहे.

बाळाला आणि नताशाला भेटण्यासाठी धवन कुटुंबिय पोहचत आहेत. डेव्हिड धवन यांना रूग्णालयाच्या बाहेर स्पॉट करण्यात आले. यावेळी पापाराझी यांनी डेव्हिड धवन यांना विचारले की, नताशाची तब्येत कशी आहे? यावर डेव्हिड धवन म्हणाले की, नताशाची तब्येत फर्स्ट क्लास आहे. मुलीच्या जन्मानंतर वरुण धवन याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

या पोस्टमध्ये वरुण धवन हा आपला आनंद व्यक्त करताना दिसला. वरुण धवन आणि नताशा यांनी मुलीच्या नावाची घोषणा अजून केली नाहीये. चाहते मुलीच्या नावाबद्दल सतत विचारणा करताना दिसत आहेत. वरुण धवन याने 24 जानेवारी 2021 ला नताशा दलाल हिच्यासोबत लग्न केले. आलिबागला यांचे लग्न झाले. या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

वरुण धवन आणि नताशा दलाल हे बऱ्याच वर्षांपासून मित्र होते. त्यानंतर यांनी एकमेकांना डेट केले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. वरुण धवन हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करतानाही वरुण धवन दिसला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;