वडिलांना दिलेल्या वचनामुळे मी गप्प..; ‘ये रिश्ता..’च्या निर्मात्यांसोबतच्या वादावर काय म्हणाली हिना?
अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचली. ही तिच्या करिअरमधील पहिलीची मालिका होती. मात्र सहा वर्षांनंतर तिने त्यातून काढता पाय घेतला होता. मालिका सोडताना हिनाचा निर्माते राजन शाही यांच्यासोबत वाद झाला होता.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राजन शाही यांनी हिनाचं मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं होतं. "मालिकेत आलेल्या लीपमुळे हिना खुश नव्हती. म्हणून ती सतत स्क्रीप्टमध्ये हस्तक्षेप करत होती. इतकंच नव्हे तर शिवांगी जोशीचं महत्त्व वाढवणारे डायलॉग्स बोलण्यास तिने नकार दिला होता", असं ते म्हणाले होते.
"मी तिला बजावलं होतं की जे सीन्स जसे आहेत, तुला तसेच शूट करावे लागतील. त्याला तिने स्पष्ट नकार दिला. तेव्हा मी सुनावलं की शूट पूर्ण कर किंवा सेटवरून निघून जा. त्यादिवशी ती पूर्ण दिवस मेकअप रुममध्ये बसली होती. रात्री जेव्हा ती सेटवरून गेली, तेव्हा तिला मेसेज करण्यात आला की तिला यापुढे सेटवर यायची गरज नाही. तिचा करार रद्द करण्यात आला आहे", अशी बाजू राजन शाही यांनी सांगितली होती.
राजन शाही यांच्या आरोपांवर आता हिना खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. "मी कधीच कोणाविषयी वाईट बोलत नाही. माझ्या मनात राजन शाही यांच्याबद्दल खूप आदर आहे. ते माझ्याबद्दल असं का म्हणाले माहीत नाही. त्यांनी मला करिअरमधील पहिली संधी दिली होती", असं हिना म्हणाली.
याविषयी तिने पुढे सांगितलं, "मी जेव्हा 'ये रिश्ता..' ही मालिका सोडली, तेव्हा माझे वडील खूप निराश होते. इतकी वर्षे काम केल्यानंतर मालिका सोडताना काही गोष्टी सकारात्मकदृष्ट्या संपल्या नाहीत. वडिलांनी माझ्याकडून वचन मागितलं होतं की, मी कधीच त्या मालिकेविषयी वाईट बोलणार नाही."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.







Comment List