कपिल शर्माचे ‘हे’ बोलणे ऐकताच सानिया मिर्झा संतापली, थेट म्हणाली, तू पागल…
कपिल शर्मा हा सध्या त्याच्या नव्या कॉमेडी शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मधून तो चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतोय. OTT प्लॅटफॉर्म Netflix वर हा शो बघायला मिळतोय. सध्या कपिल शर्मा याच्या शोच्या आगामी भागाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये कपिल शर्मा हा सानिया मिर्झा हिच्यासोबत धमाल करताना देखील दिसतोय. सानिया मिर्झा, सानिया नेहवाल, मेरी कोम आणि सिफ्ट कौर समरा या कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचल्या. यावेळी धमाल करताना हे सर्वजण दिसत आहेत.
कपिल शर्मा आणि सानिया मिर्झा मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी कपिल शर्मा हा सानिया मिर्झा हिला म्हणतो की, तू ज्यावेळी शॉपिंग करण्यासाठी बाहेर जाते, त्यावेळी तू सोने खरेदीच करत नसशील. कारण तू इतके जास्त गोल्ड मेडल्स जिंकले आहेत की, तुला सोने खरेदी करण्याची काही गरजच पडत नसेल. यावेळी सर्वजण हसताना दिसत आहेत.
यावर रागाने उत्तर देताना सानिया मिर्झा म्हणते की, नाही, आम्ही फक्त गोल्ड मेडल्सच घालून बाहेर जातो..पागल आहेस का? सानिया मिर्झा हिचे हे विधान ऐकून कपिल शर्मा हा हैराण होताना दिसला. यावर कपिल शर्मा हा सानिया मिर्झाला म्हणतो की, अगोदरच्या जन्मात बहुतेक तू माझी जेठानी होतीस. हेच नाही तर यानंतर कपिल शर्मा आणि सानिया मिर्झा धमाल करताना दिसले.
यानंतर कपिल आणि सानिया सासू आणि सुनेच्या भूमिकेत दिसत आहेत. हा एपिसोड धमाकेदार होणार हे व्हायरल होणाऱ्या प्रोमोमधून स्पष्ट दिसत आहे. कपिल शर्मा याचा हा नवा शो बंद होणार असल्याची तूफान चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगताना दिसली. लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद हा मिळत नसल्याने शो बंद पडणार असल्याचे सांगितले जात होते.
आता हे स्पष्ट करण्यात आले की, शो बंद पडणार नाहीये. सानिया मिर्झा हिच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे देखील बघायला मिळतंय. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झालाय. हेच नाही तर सानिया मिर्झा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर शोएब मलिक याने थेट दुसरे लग्न देखील केले. पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत शोएब मलिकने लग्न केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List