निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये हल्ला, पोलिसांचा फौजफाटा तैनात

निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये हल्ला, पोलिसांचा फौजफाटा तैनात

लोकसभा निवडणुकीत नगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा लंके यांनी पराभव केला. या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण पेटले असून समर्थक आमनेसामने आले आहेत. लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली.

लोकसभा निवडणुकांनंतर पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. लंके यांच्या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ हल्ला झाला. या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने त्यांना जास्त इजा झालेली नाही. मात्र त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लंके समर्थक घटनास्थळी जमा झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;