सैफला घटस्फोट दिल्याच्या 20 वर्षांनंतर अमृता सिंह करणार दुसरं लग्न? म्हणाली..
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या घटस्फोटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1991 मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांनी 2004 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर या वीस वर्षांत सैफ आणि अमृता कधीच एकत्र दिसले नाहीत. पण सारा आणि इब्राहिम या मुलांसोबत सैफचं नेहमी भेटणं-बोलणं सुरू असतं.
एका मुलाखतीत अमृताने घटस्फोटाच्या इतक्या वर्षांनंतर दुसऱ्या लग्नाविषयी आपलं मत मांडलं. ती पुन्हा लग्न करणार का, भविष्यातील तिचा प्लॅन काय आहे, याविषयी तिला विचारण्यात आलं होतं. पूजा बेदीला दिलेल्या या मुलाखतीत अमृताने दुसऱ्या लग्नाविषयी मोकळं मत मांडलं.
ती म्हणाली, "मला पुढे जाऊन लग्न करायचं नाहीये पण पुढे काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. हो माहीत नाही किंवा कदाचित नाही असं उत्तर द्यायला मी काही आता 16 वर्षांची तर नाही. त्यामुळे खरं सांगायचं झालं तर मला नाही वाटत."
"तुम्ही तुमच्या भविष्याविषयी काही सांगू शकत नाही. खरंतर माझ्याकडे ते सर्वकाही आहे, जो एक पुरूष मला देऊ शकतो. काही गोष्टी सोडलं तर त्यासाठी मला लग्न करण्याची काही गरज नाही", अशा शब्दांत अमृता व्यक्त झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List