वीज गायब झाली तर ‘माय बेस्ट’वर करा तक्रार; व्हॉट्सअॅप, मोबाईल नंबरसह 24 बाय 7 सेवा

वीज गायब झाली तर ‘माय बेस्ट’वर करा तक्रार; व्हॉट्सअॅप, मोबाईल नंबरसह 24 बाय 7 सेवा

झाल्यास आता माय बेस्ट या अॅपवर आपल्याला तक्रार दाखल करता येणार आहे. शिवाय व्हॉट्सअॅप आणि मोबाईल नंबरची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी प्रशासनाने जादा कर्मचाऱयांची कुमकही उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्राहकांना 24 बाय 7 अशा वेळेत प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

पावसाळय़ात ठिकठिकाणी पाणी तुंबणे, वाहतूक काsंडीची समस्या यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता अधिक असते. तसेच पाणी तुंबलेल्या ठिकाणी शॉक लागण्याचा धोका असतो. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रम सज्ज झाला असून नियंत्रण कक्ष 24 बाय 7 कार्यरत असणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी वीज ग्राहकांनी त्यांचा वीजग्राहक क्रमांक अथवा वीज मापक क्रमांक नोंदवावा. फ्युज पंट्रोल दूरध्वनी क्रमांक वीज देयकावर छापलेले असतात. वीजग्राहक क्रमांक विद्युत देयकाच्या अगदी वरील बाजूस उजव्या कोपऱयात छापलेला असतो. तसेच वीज मापक क्रमांक हा विद्युत देयकाच्या मागील बाजूस, मध्यभागी असलेल्या टेबलच्या पहिल्या रकाण्यात दर्शविण्यात येतो. या दोनपैकी एक क्रमांक तक्रार नोंदविताना आपल्या जवळ असणे अपेक्षित आहे. वीज ग्राहक त्यांच्या वीज पुरवठाबाबतच्या तक्रारी MiBest’ या अॅपवर नोंदवू शकतात. हे अॅप मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करु शकतात.

पावसाळय़ात अशी घ्या काळजी

परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडून आल्या वीजमापकांच्या केबिनपासून घरापर्यंतचे वायरिंग तसेच घरातील विद्युत उपकरणांचे वायरिंग व विद्युत संचमांडणी तपासून घ्या. तसेच आपल्या संचमांडणीमध्ये योग्य रेटिंगच्या ईएलसीबीचा वापर करा.

अतिवृष्टीच्यावेळी किंवा वीजमापक केबिनमध्ये पाणी गळू लागल्यास किंवा पाणी शिरले असता, आपल्या घरातील विजेचे मुख्य स्वीच बंद करा. परवानाधारक विद्युत पंत्राटदाराने अथवा बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱयाने सुरक्षिततेची खात्री दिल्यानंतरच वीज पुरवठा सुरू करा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;