आधी धक्का, मग वाद अन् लुटमार , लोकलमध्ये गुन्हा करणारी बंटी-बबली गजाआड

आधी धक्का, मग वाद अन् लुटमार , लोकलमध्ये गुन्हा करणारी बंटी-बबली गजाआड

लोकलने प्रवास करणाऱया प्रवासी इच्छुक स्थानकात उतरण्याच्या तयारीत असताना त्याला जाणीवपूर्वक धक्का द्यायचा, मग त्यावरून संबंधिताशी वाद घालायचा. बाचाबाची सुरू ठेवून प्रवासी स्थानकात उतरत असताना त्याचे किमती ऐवज हिसकावून ते फेकून देण्याचे नाटक करायचे, अशा प्रकारे गुन्हा करणाऱया बंटी-बबलीला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

हर्षल रक्ते (20) या तरुणाने 16 मेच्या संध्याकाळी जोगेश्वरी येथे जाण्यासाठी हार्बर मार्गावरील लोकल पकडली. अंधेरी स्थानक येताच आरोपी आयशा खान ऊर्फ अपर्णा सपकाळ (25) आणि रियान खान (23) यांनी हर्षलला टार्गेट केले. ठरल्याप्रमाणे आयशाने हर्षलला मुद्दामहून धक्का दिला. त्यानंतर रियानने लगेच हर्षलसोबत मेरी बिवी को धक्का क्यू मारा असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. बाचाबाची सुरू असताना जोगेश्वरी स्थानक आले. त्यामुळे हर्षल उतरण्याच्या प्रयत्नात असताना रियानने हर्षलच्या गळय़ातील सोन्याची चेन हिसकावली आणि फेकून देण्याचे नाटक करत पुढे निघून गेले. आपली सोन्याची चेन चोरीला गेल्याचे लक्षात येताच हर्षलने बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे गाठून तशी तक्रार दिली.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रेल्वे गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. प्रभारी निरीक्षक अरशुद्दीन शेख, निरीक्षक रोहित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकृष्ण चव्हाण तसेच होळकर व कांबळे यांनी खबरे व 80 सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने शोध घेतला असता ते बंटी-बबली सानपाडा स्थानकात उतरल्याचे आढळून आले. त्यानंतर चव्हाण व पथकाने दोघांची आणखी माहिती काढली असता दोघे आरोपी खैराणे गावात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी पथकाने खैराणे गावात सापळा रचून आयशा आणि रियान या बंटी-बबलीला पकडले. आरोपींकडून चोरीची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली. या दोघांनी अशा प्रकारे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता असून पोलीस दोघांकडे अधिक चौकशी करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;