पालीजवळ टेम्पो पुलावरून 20 फूट कोसळून तिघे जखमी

पालीजवळ टेम्पो पुलावरून 20 फूट कोसळून तिघे जखमी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर एक टेम्पो पालीजवळील कापडगाव येथील काजवी पुलावरून 20 फूट खाली कोसळून त्यात बसलेले तिघे जखमी झाले. बुधवारी दुपारी बारा वाजता हा अपघात झाला.

टेम्पो चालक ज्योतिबा सखाराम पेजे (वय 48) रा. कापडगाव, हा आपल्या ताब्यातील टाटा टेम्पो क्रमांक एमएच 08-एपी 5633 घेऊन पाली ते कापडगाव असा चालला होता. तो कापडगाव येथील काजवीपूल येथे आला असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन चौपदरीकरणासाठी चालू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी सुमारे 20 फूट खोल पडून हा अपघात झालेला आहे.

या अपघातामध्ये टेम्पोमध्ये बसून प्रवास करणारे तिघे जखमी झाले. विवेक महादेव पेजे (50) यास उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झालेली आहे. इशा रामचंद्र पेजे (32), कविता किशोर नागले (45) वर्ष यांस किरकोळ दुखापत झालेली आहे. सर्व जखमी कापडगाव येथील आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ स्टाफसह अपघात ठिकाणी भेट दिली. जखमींना उपचारेकरिता जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय पाली येथे नेले. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू आहे. या अपघाताबाबत पाली पोलीस दूरक्षेत्र येथील पोलिसांना कळविण्यात आलेले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;