पिपाणी चिन्हाचा आम्हाला फटका, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

पिपाणी चिन्हाचा आम्हाला फटका, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतपेटीच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा अभिप्राय जनतेने दिला आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्हं होते. तर त्या चिन्हांशी काहीसे साम्य असलेल्या पिपाणी देखील चिन्हं होत. या दोन चिन्हांतील गोंधळाचा फटका आम्हाला बसला आहे. परिणामी, पिपाणीला दीड लाख मतं गेली असून साताऱ्याची सीट पडण्यास हे चिन्हंच कारणीभूत आहे. पिपाणीला दीड लाख मतं गेली आहेत. तर साताऱ्याची सीट 45 हजारांनी पडली, यात 37 हजार मतं पिपाणीला गेली आहेत. असे जयंत पाटील म्हणाले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, बारामती, बीड मधला माणूस उभा राहिला, त्याला बीएसपीपेक्षाही अधिक मतं मिळाली. आम्ही भाषण करायचो, तुतारी चिन्हं सांगायचो. पण लोकांमध्ये संभ्रम झाला आणि तुतारी समजून अनेकांनी पिपाणीवर बटन दाबले. याचा आम्हाला सर्वाधिक फटका बसला. मात्र, ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असे जयंत पाटील यानी स्पष्टपणे सागितले.

जयंत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी प्रचार केल्याने महाविकास आघाडीला मोठं बळ मिळालं. 32 जागा आम्हाला मिळतील अशी अपेक्षा होती, एक दोन जागा सोडल्या तर जवळपास आकडा आम्हाला मिळाला आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी आणि आमचे युवा अध्यक्ष आम्ही गेलो होतो. दरम्यान, आम्हाला अडीच जिल्ह्यांचा पक्ष म्हणून हिणवले जायचं, मात्र आज आम्ही 8 जागा निवडून आणल्या आहेत. तर भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत. तरीही आम्हीही त्यांना म्हणणार नाही की तो अडीच जिल्ह्यांचा पक्ष आहे. असेही जयंत पाटील यानी म्हटले आहे.

यावर सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आमचे 8 खासदार राज्याचे प्रश्न ठामपणाने मांडतील. कांदा, कपाशी, ऊसाचा अथवा शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही लावून धरु. आता एक टप्पा झाला आहे. यात 80 टक्के स्ट्राइक रेट आम्ही दाखवलेला आहे. राज्यातले सरकार उखडून लावण्यासाठी आम्ही आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम उद्या जाहीर करु, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी उद्विग्न होऊन असे उद्गार का काढलेत हे माहिती नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दिल्लीत बसलेले लोकं त्यांचे भविष्य ठरवू शकतात. मात्र, महाराष्ट्रातली परिस्थिती, दोन पक्ष फोडल्यामुळे, सोबतच महागाई, बेकारी, जीएसटी यामुळे लोकं त्रस्त झाली होती. महाराष्ट्रातली कहाणी याच्याही पुढे आहे. राज्याच्या कारभाराला लोकं कंटाळली आहे. अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागल्या आहेत. लोकसभेसाठी देखील फडणवीस यांनी पूर्णपणे काम केलंय. मात्र आता तो त्यांचा तो निर्णय आहे. असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यामुळे आमचा 80 टक्के स्ट्राईक रेट होता. आम्ही दोन जागा अधिक लढवल्या असत्या तर अधिक जागा मिळाल्या असत्या. 180 पेक्षा अधिक आमदार आमचे निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभेला आता साडे तीन महिने आहेत. सुप्रियाताई सुळे यांना बारामतीत 48 हजारांचा लीड मिळाला आहे. कालच निकाल लागला आहे. त्यामुळे लोकांच्या वेगळ्या भावना आहेत. बरेचसे सोडून गेलेले नेते, आमदार, मंत्री म्हणत आहेत, आम्हाला परत पवार साहेबांसोबत काम करायचं आहे. मात्र, यासंदर्भात निर्णय झालेला नाही. जे तिकडे गेले, त्यांच्या मानसिकतेत बदल होताना दिसतोय, असं काल संध्याकाळपासून दिसतंय, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;