Maharashtra Election 2024 : देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्वाला मिसलीड केलं; पृथ्वीराज चव्हाण यांचा निशाणा

Maharashtra Election 2024 : देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्वाला मिसलीड केलं; पृथ्वीराज चव्हाण यांचा निशाणा

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या आणि भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आता यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल केल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच राज्य सरकारमध्ये फेरबदलाची शक्यताही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्वाला मिसलीड केलं. एक खूप आशादायक चित्र निर्माण केलं. त्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल. त्यामुळे कुठेतरी भाजपचा ग्राउंड रियाअ‍ॅलिटी टच संपलेला आहे. त्यांनी जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं आणि त्याला नरेंद्र मोदींचा थेट आशीर्वाद मिळवला. त्याची जबाबदारी त्यांना घ्यावीच लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पराभवाचं विश्लेषण ते करतील. पण आता एकंदरीतच महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या रचनेत बदल होणार आहे का? मुख्यमंत्री बदलला जाणार आहे का? की फक्त देवेंद्र फडणवीसच पक्षाची जबाबदारी घेऊन पुढे जातील आणि त्यांना सत्तेतून मुक्त करणार का? हे भाजप ठरवेल. हा त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकेल, असे चव्हाण पुढे म्हणाले.

Maharashtra Election Result : फडणवीसांच्या राजीनामा अस्त्राने भाजपमध्ये खळबळ! महाराष्ट्रातील पराभवाने पक्षातील अस्वस्थता चव्हाट्यावर

काहीतरी चुकलं आहे, याची जाणीव झाली हे बरं झालं. पण आता सरकार समोर दुष्काळ हाताळणं ही महत्त्वाची बाब आहे. निवडणुकीचा निकाल लागला आहे. आचारसंहिताही संपली आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेच्या दुःखाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

ठणकावून येणार सांगणारे दणकून पडले, शरद पवारांच्या पक्षाचा फडणवीसांना टोला

हे पांगळं सरकार आहे. विधानसभेची निवडणूक एक दोन महिन्यांत जाहीर होईल. त्यामुळे या सरकारमध्ये फार काही दम राहिलेला नाही. परंतु कोणाच्या नेतृत्वाखाली जायचं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाला या मुद्द्यावर मोठा निर्णय घ्यावा लागेल. मंत्रिमंडळातून देवेंद्र फडणवीस बाहेर पडले तर तिथे पर्यायी कोण येणार? त्याला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल की त्याला मुख्यमंत्री केले जाईल. किंवा एकनाथ शिंदे यांच्यावर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याची जबाबदारी टाकली जाईल. पण एकनाथ शिंदे यांचंही हे अपयश आहे. कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनीही आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;