ठणकावून येणार सांगणारे दणकून पडले, शरद पवारांच्या पक्षाचा फडणवीसांना टोला

ठणकावून येणार सांगणारे दणकून पडले, शरद पवारांच्या पक्षाचा फडणवीसांना टोला

लोकसभा निवडणूकीचा निकाल समोर आल्यानंतर भाजप नेते चांगलेच तोंडावर पडले आहेत. एकीकडे राज्यात 40 पेक्षा जास्त जांगा जिंकण्याचा दावा करणाऱ्या महायुतीला 20 चा आकडा देखील पार करता आला नाही. तसेच भाजपकडून विजयाआधीच जल्लोषाची तयारी करण्यात आली होती. मात्र मंगळवारी निकालानंतर भाजप कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजप व 40 चा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणीसांची खिल्ली उडवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत सुरुवातीला देवेंद्र फडणवीस 40 च्या वर जागा जिंकणार असल्याचा दावा करताना दिसत आहेत. त्यानंतर भाजपकडून निकालाआधीच कशाप्रकारे जल्लोषाची तयारी करण्यात आली व नंतर त्यांना मागवलेले ढोल ताशे परत पाठवावे लागले ते दाखवण्यात आले आहे.

या व्हिडीओसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या राजीनाम्यावर भाष्य करत त्यांची खिल्ली उडवली आहे. ”कुठे गेले ४०० आणि ४५ पारचे नारे, आता तर हेच सत्तेतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करू लागले. कुठून कुठंवर आला ‘देवा’, अशा शब्दात राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;