श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोनाच्ये हार अर्पण
पुणे जिल्ह्यातील श्री विठ्ठल भक्त बबन रामचंद्र तुपे (कुंजिरवाडी, हवेली) यांनी श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. या हाराचे एकूण वजन 249 ग्रॅम असून त्याची किंमत 15 लाख 91 हजार 110 इतकी आहे.
मंदिर समितीच्या वतीने दानशूर भक्त श्री तुपे यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List