कोकण रेल्वे लावणार पाच हज़ार झाडे; जागतिक पर्यावरणदिनी संकल्प

कोकण रेल्वे लावणार पाच हज़ार झाडे; जागतिक पर्यावरणदिनी संकल्प

 

जागतिक पर्यावरण दिनानिनित्त कोकण रेल्वेने आपली कार्यालये आणि कोकण रेल्वेच्या मार्गाच्या परिसरात तब्बल पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. कोकण रेल्वेच्या या उपक्रमाची सुरवात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांच्या उपस्थितीत झाली.

गेल्या काही काळात वातावरणातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे.तापमान वाढीचे दुष्परिणाम समोर येत असताना त्यावर उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेत कोकण रेल्वेने या वर्षी एका नव्या संकल्पाची घोषणा केली. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्या संकल्पनेतून कोकण रेल्वेची कार्यालये आणि रेल्वे
मार्गवरील परिसरात पाच हजार झाडे लावण्याचे निश्चित करण्यात आले. पर्यावरण दिनाच्या औचित्य साधत या उपक्रमाची सूरवात करण्यात आली.

यावेळी झालेल्या समारंभास कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर, वन संरक्षक ठाणे के प्रतिभा आदी मान्यवर उपस्थित होते. सगळ्यांनी एकत्र येत शाश्वत विकासासाठी कोकण रेल्वे करत असलेल्या या या प्रयत्नांना साथ द्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;