जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे माझा पराभव, सदाशिव लोखंडे यांनी फोडले भाजप आणि काळे-कोल्हेंवर खापर

जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे माझा पराभव, सदाशिव लोखंडे यांनी फोडले भाजप आणि काळे-कोल्हेंवर खापर

 

नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला. शिर्डी मतदार संघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि नगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विजयी झाले. दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदार पराभूत झाले. शिर्डीत शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे, तर नगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर महायुतीतील बेबनाव समोर आला असून जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे माझा पराभव झाल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी दिली.

उत्तरेतील महायुतीच्या राजकीय नेत्यांमधील जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे माझा पराभव झाला. माझीही जिरली आणि दक्षिणेत त्यांचीही जिरली. काळेंना कोल्हेंची आणि विखे-कोल्हेंना एकमेकांची जिरवायची होती. त्यात माझीही जिरली आणि तिकडे दक्षिणेत विखे यांचीही जिरली. पण यातून
नेमके काय साध्य झाले? असा आव सदाशिव लोखंडे यांनी केला.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विधानसभा मतदारसंघातून आणि आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अकोला व संगमनेरच्या धर्तीवर मताधिक्य मिळाले असते तर माझा विजय नक्की होता. मात्र काळे-कोल्हे परिवारात एकमेकांची जिरवण्याच्या नादात माझी जिरली, असे लोखंडे यांनी म्हटले.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;