महाराष्ट्रात मोदी फॅक्टर फेल; 23 उमेदवारांसाठी सभा घेतल्या, विजयी झाले अवघे पाच, ‘मविआ’ने दिला धोबीपछाड

महाराष्ट्रात मोदी फॅक्टर फेल; 23 उमेदवारांसाठी सभा घेतल्या, विजयी झाले अवघे पाच, ‘मविआ’ने दिला धोबीपछाड

 

लोकसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागला. Bhajap- NDA ला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा दणका बसला. यंदाच्या निवडणुकीत भाजपने देशात 400 पार आणि राज्यात 45 असा नारा दिला होता. मात्र जनतेने हातात घेतलेल्या निवडणुकीत भाजपला केंद्रात 300 आणि राज्यात 20 चा आकडाही पार करता आला नाही.

देशभरात NDA ला 293 जागा मिळाल्या तर राज्यात फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष फोडून, तपास यंत्रणा मागे लावून आणि पंतप्रधान मोदींच्या 23 सभा होऊनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही.

राज्यात महायुतीला महाविकास आघाडीने धोबीपछाड दिला. या पराभवाचे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या डोक्यावर फोडले जात आहे. मोदी आणि शहा यांनी निवडणुकीपूर्वी आणि प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्यावरही महाराष्ट्राचे अनेक दौरे केले, सभा घेतल्या, रोड शो काढले. मात्र याचा भाजपला विशेष फायदा झाला नाही. उलट ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेतल्याने आणि शिवसेना राष्ट्रवादी सारखे पक्ष फोडल्याने जनतेत रोष होता. हा रोष मतपेटीतून व्यक्त झाला.

निकल गयी सब हेकडी इनकी…प्रभूरामाने मोदी आणि भाजपला नाकारले! एनडीए काठावर… 291 जागा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या 23 उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. यापैकी 18 जागांवर महायुतीचे उमेदवार पराभूत झाले आहेत. तर केवळ 5 उमेदवार विजयी झाले आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने ‘मोदी की गॅरंटी’ला कचऱ्याची टोपली दाखवली आणि आपल मत महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकले. महाविकास आघाडीने जवळपास 30 जागांवर विजय मिळवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;