Randhir Kapoor | ‘हा वाईट व्यवसाय…’, करिश्मा-करीना यांना असं का म्हणाले रणधीर कपूर?

Randhir Kapoor | ‘हा वाईट व्यवसाय…’, करिश्मा-करीना यांना असं का म्हणाले रणधीर कपूर?

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर – अभिनेत्री करीना कपूर यांचे वडील आणि दिग्गज अभिनेते रणधीर कपूर यांनी मोठ्या गोष्टीचा स्वीकार केला आहे. मुलींनी बॉलिवूडमध्ये यावं अशी रणधीर कपूर यांची इच्छा कधीच नव्हती. दोन्ही मुलांच्या यशाचं श्रेय रणधीर कपूर यांनी मुलींची आई आणि पत्नी बबिता कपूर यांना दिलं आहे. शिवाय रणधीर कपूर यांनी मुलींवर गर्व असून त्यांच्या मेहनतीचं कौतुक देखील केलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रणधीर कपूर यांनी भावना व्यक्त केल्या.

रणधीर कपूर म्हणाले, ‘मला माझ्या मुलींवर गर्व आहे. त्यांनी स्वतःच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. यासाठी त्यांची आईच त्यांच्यासाठी प्रेरणा होती. मी दोन्ही मुलींच्या यशाचं श्रेय त्यांच्या आईला देतो. पत्नीनेच दोघींना मार्ग दाखवला. मी कधीच माझ्या मुलींना पाठिंबा दिला नाही.’

‘जेव्हा दोघी लहान होत्या तेव्हा मी विचार देखील केला नव्हता की, मोठ्या होवून दोघी यशाचं उच्च शिखर गाठतील. माझ्या वडिलांनी (राज कपूर)  जे मला सांगितलं तेच मी दोघींना सांगितलं. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. जर आम्ही करत असलेला व्यवसाय वाईट असता तर, आम्ही स्वतःयात नसतो. आम्ही काम करतोय, तर तुम्हाला नकार देऊ शकत नाही.’

‘तुम्ही काम करा पण त्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ व्हा… माझ्या दोन्ही मुलींनी कोणाचं समर्थन नसताना यशाचं शिखर गाठलं, याचा मला गर्व आहे. त्यांनी खूप मेहनत केली आहे.’ असं म्हणत रणधीर कपूर मी चांगला वडील नाही… असं देखील म्हणाले…

‘अशा प्रकारे मी एक वाईट वडील आहे. तरी देखील मी आजही थोडा वेंधळा आहे. सर्वांना माहिती आहे की, मी थोडा वेंधळा आहे. मला फार मेहनत करायची नाही. मला जास्त सिनेमांमध्ये देखील काम करायचं नाही. मला आजही ऑफर येतात. पण मी त्यांना नकार देतो.’

‘मी माझ्या आयुष्यात कमावून ठेवलं आहे. आता माझी मुलं माझ्यापेक्षा जास्त कमावतात. त्यासाठी मी संतुष्ट आहे. आमच्याकडे अन्न-कपडे आणि घर… आमच्याकडे सर्वकाही आहे. त्यामुळे मला आता काहीही नको. या वयात मला दिवस – रात्र धावपळ करुन काम करायचं नाही…’ असं देखील रणधीर कपूर म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;