मराठवाडय़ात भाजपचा सुपडा साफ; शिवसेनेचे तीन शिलेदार विजयी

मराठवाडय़ात भाजपचा सुपडा साफ; शिवसेनेचे तीन शिलेदार विजयी

सर्व आठ जागा जिंकण्याच्या वल्गना करणाऱया भाजपचे नाकच मराठवाडय़ाने कापले. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे तसेच विद्यमान खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, सुधाकर शृंगारे यांचा दारुण पराभव झाला. शिवसेनेचे संजय जाधव, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि नागेश पाटील-आष्टीकर यांनी विजयाचा गुलाल उधळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मिंधे गटाचे संदिपान भुमरे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव केला.

मराठवाडय़ातील आठ जागांच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. परभणीत शिवसेनेचे संजय जाधव यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना जबरदस्त धोबीपछाड दिली. येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तिकीट कापून देवेंद्र फडणवीसांच्या हट्टाखातर जानकरांना संधी देण्यात आली. मात्र सुरुवातीपासूनच संजय जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित समजला जात होता. संजय जाधव यांना 5,93,077 तर जानकर यांना 4,47,961 मते मिळवत दीड लाखाच्या फरकाने जानकर यांचा पराभव केला. धाराशीवमध्ये पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुसंडी मारली होती. राजे निंबाळकर यांना 7,48,752 एवढी विक्रमी मते मिळाली तर अर्चना पाटील यांना 4,18,906 मतांवर समाधान मानावे लागले. सव्वातीन लाखांच्या विक्रमी फरकाने राजे निंबाळकर यांचा दणदणीत विजय झाला. हिंगोलीत शिवसेनेचे नागेश पाटील-आष्टीकर यांनी दीड लाखाच्या फरकाने जोरदार विजय मिळवला. येथे मिंधे गटाचे हेमंत पाटील यांना भाजपने विरोध करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यास भाग पाडले.

मोदींच्या वांझोटय़ा सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाडय़ात लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवात सभा घेतल्या. पण या ठिकाणी मतदारांनी महायुतीला साफ झिडकारले. लातुरात सुधाकर शृंगारे, धाराशीवमध्ये अर्चना पाटील, परभणीत महादेव जानकर, नांदेडात प्रताप पाटील चिखलीकर यांना मत म्हणजे मोदीला मत असे आवाहन करूनही मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;