“..तर तिची ठेचून हत्या झाली असती”; रवीना टंडनच्या व्हिडीओवर कंगनाची प्रतिक्रिया

“..तर तिची ठेचून हत्या झाली असती”; रवीना टंडनच्या व्हिडीओवर कंगनाची प्रतिक्रिया

“..तर तिची ठेचून हत्या झाली असती”; रवीना टंडनच्या व्हिडीओवर कंगनाची प्रतिक्रिया

अभिनेत्री रवीना टंडनच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी आता अभिनेत्री आणि भाजपची उमेदवार कंगना राणौतने प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अत्यंत चिंताजनक असल्याचं तिने म्हटलंय. रवीनावर एका वृद्ध महिलेला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. वांद्रे इथं रवीनाचा भररस्त्यात वाद झाल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार उभी करण्यावरून झालेल्या वादातून रवीना आणि तिच्या चालकाने मारहाण केल्याचा आरोप तिघांनी केला. शनिवारी रात्री वांद्रे इथल्या कार्टर रोडवर ही घटना घडली. स्थानिकांनी रवीनाच्या कारला घेराव घातल्यानंतर तिने बाहेर येऊन जमावाशी बोलण्याचा प्रयत्न केला. “कृपया मला मारू नका, माझ्या ड्राइव्हरला मारू नका”, अशी ती विनंती करताना व्हिडीओत दिसून येत आहे.

कंगनाची पोस्ट-

या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित संताप व्यक्त केला. ‘रवीना टंडनजींसोबत जे घडलं, ते खूपच चिंताजनक आहे. विरुद्ध गटात आणखी पाच-सहा लोक असते तर तिची ठेचून हत्या झाली असती. अशा रोड रेजच्या उद्रेकाचा आम्ही निषेध करतो. अशा लोकांना फटकारलं पाहिजे. त्यांनी अशा पद्धतीने हिंसक आणि विषारी वागू नये’, असं कंगनाने लिहिलं.

नेमकं काय घडलं?

कार्टर रोड परिसरात रवीनाचा ड्राइव्हर कारची पार्किंग करताना मागे एक वृद्ध महिला उभी होती. कार फिरवताना वृद्ध महिलेला धडक लागल्याचा आरोप तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीने केला. यानंतर तिथे काही स्थानिक लोक जमले आणि त्यांनी रवीनाच्या ड्राइव्हरला कारबाहेर काढून मारण्यास सुरुवात केली. तेव्हा रवीना मध्यस्थी करण्यासाठी आली आणि तिने लोकांना विनंती केली. “कृपया माझ्या ड्राइव्हरला मारू नका, हात उचलू नका”, अशी विनंती रवीनाने केली. रवीनाच्या मते तिच्या कारची धडक वृद्ध महिलेला लागलीच नव्हती. तरीही स्थानिकांनी वाद वाढवला. तर दुसरीकडे संबंधित वृद्ध महिलेसोबत असलेल्या व्यक्तीने रवीनासह तिच्या चालकावर मारहाण आणि शिवीगाळचा आरोप केला.

पोलीस काय म्हणाले?

खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीत असं दिसून आलं की संबंधित वृद्ध महिला ही रवीनाच्या कारजवळच उभी होती, मात्र त्यांना कारची धडक लागली नव्हती. या घटनेनंतर तिथल्या स्थानिकांनी रवीनासह चालकाने तिघांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप केला. याप्रकरणी कोणताच एफआयआर दाखल झाला नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;