Lok Sabha Election Result : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विजयी, सुजय-विखे पाटील यांचा पराभव

Lok Sabha Election Result : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विजयी, सुजय-विखे पाटील यांचा पराभव

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके विजयी झाले आहेत. निलेश लंके यांचा 2 लाख 71 हजार 170 मताधिक्क्यांनी विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे.

अहिल्यानगर भागात सुजय विखे पाटील अजिबात फिरकत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्याचं थेट प्रतिबिंब मतपेटीतून दिसून आलं आहे.

  • निलेश लंके विजयी
  • निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात चुरशीची लढत
  • निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस 4808 – मतांनी आघाडीवर
  • आठव्या फेरीमध्ये मिळालेल्या मतानुसार, अहिल्यानगरमधून निलेश लंके आघाडीवर
  • अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर सुजय विखे 4729 मतांनी आघाडीवर आहे.
  • सुजय विखे-पाटील पिछाडीवर

अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके आणि भाजपचे सुजय विखे पाटील यांच्यात थेट लढत आहे.

 

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ दिलीपकुमार मनसुखलाल गांधी भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ तुकाराम गडाख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ दिलीपकुमार मनसुखलाल गांधी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ दिलीप गांधी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- सुजय विखे पाटील भारतीय जनता पक्ष

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;