Lok Sabha Election Result : माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला

Lok Sabha Election Result :  माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला

माढा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली. यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय मिळवला.

धैर्यशील मोहिते पाटील यांना 5 लाख 7663 मतं मिळाली, तर भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 4 लाख 45 हजार 903 मतं मिळाली. मोहिते पाटील यांनी 61 हजारांहून मतांनी विजय मिळवला. यानंतर कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालून सत्कार केला.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा २००९-२०१४ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- रणजित नाईक-निंबाळकर भाजप

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;