मासिक पाळीत होणाऱ्या वेदना, संजीदा शेखने पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून म्हणाल…
बॉलिवूडचे सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सिनेमा तवायफ महिलांच्या जिवनावर आधारलेला आहे. अभिनेता मनिषा कोईराला, अदिती राव हैदरी यांनी दमदार अभिनयाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर वहीदा भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीदा शेख हिने ‘नजरिया की मारी’ गाण्यावर मुजरा करत चाहत्यांना घायाळ केलं.
संजीदा शेखा हिने ‘नजरिया की मारी’ गाण्यावर दाखवलेल्या अदा सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान एक खुलासा केला होत. गाण्याचं शुट अभिनेत्रीने मासिक पाळी सुरु असताना केलं होते. आता संजीदा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
संजीदा हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रिहर्सल करताना दिसत आहे. संजीदा हिच्या अदा, नजाकत, चेहऱ्यावरील हावभाव आणि नृत्य कौशल्याने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. जमीनीवर बसून अभिनेत्री दमदार डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होणार आहे.
संजीदा हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘संजीदा तू कमाल केलं आहे… तुला खूप खूप शुभेच्छा…’ दुसरा एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘पूर्ण सीरिजमध्ये हेच एक गाणं चांगलं वाटत आहे…’
मासिक पाळीबद्दल काय म्हणाली होती संजीदा शेख?
‘मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी ‘हीरामंडी’ सीरिजसाठी माझा पहिला मुजरा शूट केला. जेव्हा मासिक पाळीचा दुसरा दिवस असतो, तेव्हा शारीरिक वेदना होतात. सतत चिडचीड होते. पण मी माझ्या कामात पूर्णपणे मग्न होती, त्यामुळे मला कधीच त्रास जाणवला नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली होती.
संजीदा शेख हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने याआधी अनेक प्रसिद्ध मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. संजीदा टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List