Lok Sabha Election 2024: उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्ज्वल निकम पराभूत

Lok Sabha Election 2024: उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्ज्वल निकम पराभूत

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे. गायकवाड यांचा 4436 मताधिक्क्याने विजय झाला असून भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.

2014 आणि 2019मध्ये या मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन या विजयी झाल्या होत्या. मात्र, मतदारसंघाशी तुटलेल्या संपर्कामुळे यंदा हे तिकीट उज्ज्वल निकम यांना देण्यात आलं होतं.

उत्तर मध्य मुंबई हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघामध्ये मुंबईमधील 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.  या मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्वल निकम यांच्यात लढत होती

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा 1999-2004 मनोहर जोशी शिवसेना
चौदावी लोकसभा 2004-2009 एकनाथ गायकवाड काँग्रेस
पंधरावी लोकसभा 2009-2014 प्रिया दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा 2014-2019 पूनम महाजन भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा 2019-2024 पूनम महाजन भारतीय जनता पक्ष

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;