मोदींचा नाही तर उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलो! अरविंद सावंत यांची सणसणीत प्रतिक्रिया

मोदींचा नाही तर उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलो! अरविंद सावंत यांची सणसणीत प्रतिक्रिया

दक्षिण मुंबईतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले आहेत. सावंत यांनी मिंधे गटाच्या यामिनी जाधव यांचा तब्बल 54 हजार मतांनी पराभव करत त्यांच्या विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. विजयानंतर अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली.

”ज्या विश्वासाने उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो व मी एकही पैसा न वाटता मला मतदान करणाऱ्या मतदारांचा मी कायम कृतज्ञ राहीन, अशी प्रतिक्रीया अरविंद सावंत यांनी दिली.

”मोदींचा चेहरा घेऊन जिंकत आलो असा आमच्यावर कायम आरोप झाला. आज मला खूप आनंद होतोय की मी उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलोय. मोदींचा चेहरा न घेता जिंकलो याचा मला जास्त आनंद आहे. आदरणीय उद्धव ठाकरे हे या निवडणूकीचे मॅन ऑफ द सिरीज आहेत. त्यांच्याभोवती ही निवडणूक फिरत होती. त्यांचं कोव्हिडमध्ये केलेलं काम आणि त्यानंतर त्यांच्यासोबत झालेला दगा त्याचा लोकांना राग होता. उद्धव ठाकरेंनी ज्या आक्रमकपणे राज्यात प्रचार केला व टक्कर दिली. ते महाराष्ट्राच्या इतिहासात लिहले जाईल”, असे अरविंद सावंत म्हणाले.

यावेळी भाजपवर टीका करताना अरविंद सावंत यांनी त्यांच्या 400 पारच्या दाव्याची खिल्ली उडवली. ”ते 400 पार जाणार होते आता विचारा त्यांना की कुठे आहेत. ते जेमतेम 235 वर आहेत. त्यांनी बहुमताचा आकडा पार केलेला नाही. आता त्यांची जमवाजमवी सुरू झाली असेल. हे त्यांचं स्किल आहे”, असे अरविंद सावंत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;