Lok Sabha Election Result 2024: अरविंद सावंत यांची हॅट्ट्रीक, दक्षिण मुंबईतून दणदणीत विजय

Lok Sabha Election Result 2024: अरविंद सावंत यांची हॅट्ट्रीक, दक्षिण मुंबईतून दणदणीत विजय

दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले आहेत. अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. दक्षिण मुंबई या मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत आणि मिंधे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होती.

मोदींचा चेहरा घेऊन जिंकत आलो असा कायम आरोप झाला. आज मला खूप आनंद होतोय की मी उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलोय. मोदींचा चेहरा न घेता जिंकलो याचा मला जास्त आनंद आहे, अशी प्रतिक्रीया अरविंद सावंत यांनी विजयानंतर दिली.

अरविंद सावंत हे 2014 आणि 2019 ला या मतदारसंघातून निवडून आले होते. शिवसेनेचे निष्ठावंत असलेले अरविंद सावंत यांना नागरिकांनी स्वीकारले असून गद्दार गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव झाला आहे.

एक्झिट पोलने देखील या मतदारसंघातून अरविंद सावंत यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर यामिनी जाधव यांनी आपल्याला ही निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. मात्र आदेश आल्याने आपण निवडणूक लढल्याचे सांगितले होते.

– मुंबई दक्षिण मतदारसंघातून अरविंद सावंत 35 हजार मतांनी आघाडीवर

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ जयवंतीबेन मेहता भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ मिलिंद देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ मिलिंद देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अरविंद सावंत शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- अरविंद सावंत शिवसेना

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;