Ashok Saraf : बँकेत नोकरी ते दिग्गज अभिनेते, कसा होता अशोक सराफ यांचा प्रवास?
अनेक सिनेमा आणि मलिकांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेते अशोक सराफ यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनयसम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलं आहे. आज अशोक सराफ यांच्या वाढदिवस असल्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘एक उनाड दिवस’ अशा चित्रपटातून दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ‘मामा’ अर्थात अभिनेते अशोक सराफ यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही.
आज अशोक सफार अनेकांच्या प्रेरणा स्थानी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अशोक सराफ बँकेत नोकरी करत होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करावी अशी, अशोक सराफ यांच्या वडिलांची इच्छा होती, पण अशोक यांचे स्वप्न काही वेगळेच होतं. अशोक सराफ यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाहीतर, स्वप्न पूर्ण देखील केलं.
सुरुवातीला वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोक सराफ यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी जवळपास 10 वर्ष नोकरी केली. नोकरी करत असताना देखील अभिनेता होण्याचं स्वप्न अशोक सराफ यांनी मागे ठवलं नाही. ते नोकरी सांभाळत नाटकांमध्ये देखील भाग घेत होते.
अशोक सराफ यांचं मराठी कलाविश्वात मानाचं स्थान आहे. त्यांनी फक्त मराठी नाहीतर, हिंदी कलाविश्वात देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अशोक सराफ यांनी इंडस्ट्रीत 250 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अशोक सराफ यांच्या सिनेविश्वातील कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर, 40 वर्षांच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी अनेक उत्कृष्ट हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहेत. त्यांनी करण अर्जुन, कोयला, घर घर की कहानी, मुद्दा, दिल ही तो है, बेनम बादशाह, घर द्वार, बंधन, प्यार किया तो डरना क्या, जोडी नंबर आणि सिंघम असे अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List