#ElectionResults निकाल लागायचा तो लागेल, पण… संजय राऊतांचं मोठं विधान
‘एक्झिट पोलमध्ये भाजप आणि महायुतीला मोठे आकडे दाखवले जात होते. मात्र प्रत्यक्षात आताचे कल लक्षात घेता देशात, उत्तर प्रदेशात आणि महाराष्ट्रात INDIA आघाडीच्या दिशेनंच कल आहे. निकाल काहीही लागो हाच देशाचा कल आहे’, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
‘मी निकालांवर काही बोलणार नाही. कारण हे फक्त कल आहेत. तुम्ही विचारत आहात म्हणून मी कलाच्या दृष्टीने उत्तर देत आहे’, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील लक्ष्य केलं. ‘पहिल्या तीन फेरींमध्ये देवाचे अवतार आणि काशीचे पुत्र म्हणवणारे नरेंद्र मोदी हे पिछाडीवर होते. तेव्हा हा जो कल आहे, उत्तर प्रदेशचा जो कल आहे तोच देशाचा कल आहे’, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List