‘महा ऊसनोंदणी’ ऍपवर 15 जूनपर्यंत माहिती भरली तरच गाळप परवाना मिळणार, साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

‘महा ऊसनोंदणी’ ऍपवर 15 जूनपर्यंत माहिती भरली तरच गाळप परवाना मिळणार, साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या ‘महा ऊसनोंदणी’ या पोर्टलवर सर्व कारखान्यांनी 2024-25 गाळप हंगामासाठी त्यांच्याकडे नोंद झालेल्या शेतकरीनिहाय ऊसक्षेत्राची माहिती 15 जूनपर्यंत भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेत माहिती न भरलेल्या साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाकरिता ऊसगाळप परवाना दिला जाणार नसल्याचा इशारा साखर आयुक्तालयाने दिला आहे.

राज्यातील गाळप हंगामात ऊस उत्पादन, ऊसगाळप, साखर उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांच्या  डिजिटायझेशन आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने साखर संचालक (प्रशासन) राजेश सुरवसे यांनी सर्व सहकारी आणि खासगी कारखान्यांना ऊस नोंदणीची माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक केले असून, त्याबाबतच्या सूचनाही कारखान्यांना देण्यात आल्या आहेत.

ऊसनोंदणीची माहिती संकेतस्थळावर भरायची आहे. माहिती भरण्यासाठी सर्वप्रथम लॉगीन करणे आवश्यक आहे. त्यासाठी गाळप परवान्यासाठी जो युजर आयडी व पासवर्ड वापरण्यात येतो, त्याचाच वापर करावा. ऊस नोंदणीची एक्सेल फॉरमॅट डाऊनलोड करून या फॉरमॅटमध्ये कोणताही बदल न करता ऊस उत्पादक शेतकऱयांची माहिती भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यावेळी सर्व आकडे इंग्रजीमध्येच भरणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये मोबाइल नंबर, आधार नंबर, सर्व्हे नंबर, खाते क्रमांक आदींचा समावेश आहे.

माहितीतील शेतकऱयांची नावे व इतर माहिती मराठीमध्येच भरायची आहेत. माहिती भरून एक्सेल शीट तयार झाल्यावर प्रथम सेव्ह करून ऊसनोंद माहितीची एक्सेल शीट अपलोड करावी. त्याबाबतची कारखान्यांची कार्यशाळाही आयुक्तालयाच्या वतीने नुकतीच घेण्यात आली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासदांचे ऊसनोंद क्षेत्र, बिगर सभासदांचे ऊस नोंदक्षेत्र, कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचे करारांतर्गत ऊसनोंद क्षेत्र, राज्याबाहेरील ऊस उत्पादकांच्या करारांतर्गत ऊस नोंद क्षेत्राची माहितीची एकत्रित नोंद करणे आवश्यक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;