महाराष्ट्र प्रीमियर लीग – ईगल नाशिक टायटन्सची विजयी सलामी
ईगल नाशिक टायटन्स संघाने 4 एस पुणेरी बाप्पा संघाचा 7 धावांनी पराभव करीत महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी विजयी सलामी दिली. रणजीत निकमच्या नाबाद 66 धावांसह मुकेश चौधरी (3-30), अर्शिन कुलकर्णी (3-35) यांची भन्नाट गोलंदाजी ही नाशिक टायटन्सच्या विजयाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
संक्षिप्त धावफलक ः ईगल नाशिक टायटन्स ः 20 षटकांत 6 बाद 196 धावा (रणजीत निकम नाबाद 66, अथर्व काळे 37, रोहित हडके 24, हरी सावंत 22, धनराज शिंदे 17, दिग्विजय देशमुख नाबाद 14, सचिन भोसले 2-21, रोशन वाघसरे 1-25, रोहन दामले 1-39, रामकृष्ण घोष 1-49) वि. वि. 4 एस पुणेरी बाप्पा ः 20 षटकांत 9 बाद 188 धावा (ऋतुराज गायकवाड 38, यश क्षीरसागर 36, राहुल देसाई 24, सूरज शिंदे 23, रोहन दामले 20, रामकृष्ण घोष 12, पवन शहा 12, मुकेश चौधरी 3-30, अर्शिन कुलकर्णी 3-35, हरी सावंत 2-20, दिग्विजय देशमुख 1-29); सामनावीर ः रणजीत निकम.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List