दुष्काळाबाबत राज्य सरकार निद्रिस्त अवस्थेत!

दुष्काळाबाबत राज्य सरकार निद्रिस्त अवस्थेत!

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असून, पिण्याचे पाणी आणि चाऱयाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची तीन ते चार किलोमीटर पायपीट होत आहे. चारा नसल्याने शेतकऱयांना जनावरे विकावी लागत आहेत. फळबागा करपून गेल्या आहेत. अनेक शहरांना 15 दिवसांनी पाणी मिळत आहे. एवढी भयंकर परिस्थिती असताना सरकार मात्र दुष्काळाबाबत निद्रिस्त अवस्थेत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

दुष्काळाच्या परिस्थितीबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जिह्यांचा आढावा घेण्यासाठी रविवारी आमदार चव्हाण यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली. यावेळी समितीमधील सदस्य माजी मंत्री आमदार सतेज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, संजय जगताप, विक्रमसिंह सावंत, राजू आवळे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे, सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विभागवार दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली आहे. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. या समितीमध्ये एकूण 13 सदस्य आहेत. हे सर्व सदस्य लोकप्रतिनिधी असून, त्यांच्या जिह्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मिटिंग झाली. यामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती सदस्यांनी दिली. सद्यस्थितीला प्रत्येकच जिह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ ठोस निर्णय घेऊन निवडणूक आयोगाला विनंती करून राज्यामधील दुष्काळी परिस्थितीची माहिती देऊन आचारसंहिता शिथिल करण्याबाबत प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी

येत्या दोन दिवसांतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिह्यात समिती सदस्यांसोबत दौरा काढून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. दुष्काळाची दाहकता सरकारला अजून समजलेली दिसत नसल्याने वेळकाढू भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. राज्यातील शेतकरी, त्यांची जनावरे पाण्याविना तडफडत आहेत. शेतीपिकाला पाणी नाही. शेकडो गावांमध्ये तसेच शहरामध्ये 15 दिवसांतून पाणी येत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून तत्काळ उपाययोजना केल्या जाव्यात, यासाठी महाराष्ट्र काँग्रेस तत्पर असेल, अशी माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;