तब्बल 10 वर्षांनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन
स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 17 जून पासून 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोमधून शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे म्हणजेच गायत्री आणि तेजस लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे गायत्री प्रभू.
गायत्रीचा माणसांपेक्षा पैशांवर जास्त विश्वास आहे. प्रभू कुटुंबाची भली मोठी वास्तू आणि प्रतिष्ठा पाहूनच तिने या घरची सून होण्याचा निर्णय घेतला. गायत्री हुशार आणि स्वावलंबी आहे. ती फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे. तिचा रेकॉर्ड आजवर कुणीच मोडलेला नाही.
गायत्रीला समोरच्या व्यक्तीला हरताना पाहायला आवडतं. ती कधीच कोणाला स्वत:समोर जिंकू देत नाही, त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. अभिनेत्री मानसी कुलकर्णी गायत्री प्रभू हे पात्र साकारणार आहे. 10 वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करताना प्रचंड उत्सुकता असल्याची भावना मानसीने व्यक्त केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List