दैव बलवत्तर म्हणून बचावला, राहुरीत बिबट्याची दहशत, वनविभाग उदासीन

दैव बलवत्तर म्हणून बचावला, राहुरीत बिबट्याची दहशत, वनविभाग उदासीन

राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथील राऊत वस्तीवर ऊसाची खांदणी करीत असताना धुळा वडीतके या शेतकऱ्याच्या मागे बिबट्या लागला होता. दैव बलवत्तर म्हणून वाचला या घटनेमुळे परीसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन व्यवस्थेच्या द्रुष्टीने शेतकरी माणसे नाहीत का? बिबट्या दिवसाढवळ्या शेतकऱ्यांवर व त्यांच्या लहान मुलांवर जीवघेणा हल्ला करत आहे. परंतु वन विभागाची मात्र उदानसिता दिसुन येत आहे.

राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथिल राऊत वस्ती येथे धुळा वडीतके हा शेतकरी ऊसात बैलांच्या साहय्याने खांदणी काम करत असताना ऊसात लपलेल्या बिबट्याने वडीतके याच्याकडे हल्ला करण्याच्या उद्देशाने धाव घेतली. वडीतके जिवाच्या आकांताने आरडाओरड करीत शेजारील शेतात काम करत असलेल्या कामगारांकडे पळाले येथील 3 ते 4 कामगारांनी हातात काठ्या घेवून वडीतकेच्या मदतीला धावले. हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या बिबट्याला पळून लावले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे शेती करणेच अवघड झाले आहे. शेतमजुर शेतात काम करण्यास घाबरतात. रस्त्याने जाता येताना बिबट्या हल्ला करण्याची भिती निर्माण झाली आहे .ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे पिंजरा लावण्याची मागणी यापूर्वी अनेक वेळा केली आहे.

वन विभागाच्या उदासिन कारभारामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जीव महत्वाचा आहे की नाही. या विषयी वन विभागाला काही देणे घेणे नसल्याने पिंजरा लावण्याची कार्यवाहीची अपेक्षा निश्चितच अवास्तव आहे असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. शहरात वातानुकुलीत कार्यालयात बसुन वन्यप्राणी संरक्षणाचे कायदे करणारे महान पर्यावरणवादी यांनी शेतमजुर व शेतकऱ्यांचा कधी विचार केलाय का? हातावर पोट असणारे गोरगरीबांचे जीवन आणि वातानुकुलीत बसुन कायदे बनविणाऱ्या मध्ये जिव संरक्षणावर चर्चा सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी जिव संरक्षण कायदा होणे गरजेचे आहे.अशी मागणी येथिल रहिवाशी प्रा.सतिश राऊत यांनी केली आहे.

शासन व्यवस्थेच्या द्रुष्टीने शेतकरी माणसे नाहीत.तर क्षुद्र जिवजंतू असल्याचे दर्शविले जात आहे.बिबट्या दिवसाढवळ्या शेतकऱ्यांवर व त्यांच्या लहान मुलांवर जीवघेणा हल्ला करत आहे.परंतू वन विभागाची माञ उदानसिता दिसुन येत आहे. फुकटचे सल्ले देण्यापेक्षा पकडलेल्या बिबट्यांचे निर्बिजीकरण करणे जेणे करुन बिबट्यांच्या संख्येवर मर्यादा येईल. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना शेतात काम करुन माणूस म्हणून जगता येईल.

वनविभाग उदासीन

वन विभागाकडे बिबट्या पकडण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे पिंजरा लावण्याची मागणी केली तर वन विभागाकडे रेकाँडींग केल्या प्रमाणे एक उत्तर मिळते अपुरे पिंजरे असल्याने सर्वच ठिकाणी पिंजरे देवूच शकत नाही. शेतकरी व शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केल्या नंतरच पिंजरा लावणार असेल तर गरीब शेतमजुर व शेतकऱ्यांचा जिव धोक्यात घालण्याचा अधिकार शासन प्रतिनिधींना आहे का? शासकिय सल्ल्याची उबग आली असल्याची प्रतिक्रिया प्रा.सतिष राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;