जालगाव येथील प्रौढाची ऑनलाईन फसवणूक

जालगाव येथील प्रौढाची ऑनलाईन फसवणूक

दापोली शहरालगत असलेल्या जालगाव येथील एका प्रौढाला ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी 12.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरून फोन आला. फिर्यादी यांना प्राप्त झालेल्या क्रेडीट कार्डाबाबत व्हेरिफिकेशन करावयाचे आहे असे सांगून फिर्यादी यांचे क्रेडिट कार्डवरील 16 अंकी नंबर, सी. व्ही. सी. नंबर व एक्सपायरी तारीख याबाबत फिर्यादी यांनी त्या फोनवरील व्यक्तीला काहीही माहिती न देता सदर व्यक्तीने सांगितलेले सर्व माहिती बरोबर आहे का ते तपासून, ती माहिती बरोबर असल्याचे त्यास सांगितले. त्यानंतर त्या फोन वरील व्यक्तीने पाठवलेल्या 6 अंकी व्हेरिफिकेशन नंबर सेव्ह करून ठेवला होता. त्यानंतर 30 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता फिर्यादी हे एच. डी. एफ. सी. बँक शाखा दापोली येथे गेले असता तेथील बँक ऑफिसरला फिर्यादी यांनी सांगितले की, मला जो व्हेरिफिकेशन नंबर बँकेकडून पाठविला आहे तो नंबर पाहून आपण मला पिन नंबर बदली करण्यास मार्गदर्शन करावे. त्याबाबत बँक ऑफिसर यांनी बँकेचे लॅपटॉपवर फिर्यादी यांचे नावासहित क्रेडीट कार्डची माहिती भरली असता फिर्यादी यांचे क्रेडीट कार्ड वरून 95,044.62 रूपये इतकी रक्कम 29 एप्रिल रोजी दुपारी 1च्या सुमारास  ‘नो ब्रोकर’ मध्ये गेले असल्याचे सांगितले म्हणून गुन्हा दाखल केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;