रेल्वे क्रॉसिंगवर युवकाचा जीव गेला; कंपनीला जबाबदार धरत ग्रामस्थांनी बंद पाडले कंपनीचे काम; आंदोलनाचा इशारा

रेल्वे क्रॉसिंगवर युवकाचा जीव गेला; कंपनीला जबाबदार धरत ग्रामस्थांनी बंद पाडले कंपनीचे काम; आंदोलनाचा इशारा

देहरे (ता. नगर) येथे रेल्वे क्रॉसिंगवर एका युवकाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. वारंवार भुयारी मार्गासाठी पाठपुरावा करुनही दुर्लक्ष करणाऱ्या एम.एस. मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुरु असलेल्या प्रकल्पाचे काम सोमवारी ग्रामस्थांनी बंद पाडले. तर तातडीने भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देहरे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

देहरे येथील भुयारी मार्गाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना रविवारी प्रदीप रामदास पटारे या युवकाचा रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. या मृत्यूस कंपनी जबाबदार असून ग्रामस्थांनी एम.एस. मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्लांट बंद पाडला. कंपनीने रस्त्याचे काम करताना देहरे येथे प्लांट करण्यासाठी ना हरकत दाखला घेताना भुयारी मार्गाचे काम आधी करून देण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. परंतु ते काम अद्यापि सुरू केलेले नाही. दरम्यानच्या काळात डिसेंबरमध्ये उपसरपंच प्राध्यापक दीपक नाना जाधव यांनी भुयारी मार्गाचे काम सुरू करावे म्हणून आमरण उपोषण केले होते. तेव्हा काम महिन्याभरात सुरू करतो, असे आश्‍वासन कंपनीच्या प्रतिनिधींनी दिले. कंपनीने काम सुरू केले, परंतु ते फक्त दाखविण्यासाठी एक महिन्यात पूर्ण होणारे काम चार महिने झाले तरी पूर्ण झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

नुकतेच रेल्वे लाईन क्रॉस करताना युवकाला आपला जीव गमवावा लागला असून, अजून असे किती जिवांचे बळी कंपनी घेणार? असा प्रश्‍न ग्रामस्थ विचारत आहे. तर कंपनीने तातडीने भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या आंदोलनात उपसरपंच प्रा. दीपक जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश लांडगे, किरण लांडगे, अजित काळे, माजी सरपंच भानुदास भगत, सुनील बालवे, महेश काळे, नितीन भांबळ, रमेश काळे, अनिल चोर, रावसाहेब चोर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी झाले होते.

15 जून पासून शाळा सुरू होणार आहेत. पूर्वी एकच रेल्वे ट्रॅक होता. आता दुसराही ट्रॅक सुरू झाल्याने गाडी कुठून व कोणत्या ट्रेक वरून येत आहे हे लक्षात येत नाही. या रेल्वे लाईन मुळे गावाचे पूर्व-पश्‍चिम असे दोन भाग झाले असून, शाळा, दवाखाना, बँक, बाजार, डेरी अशा कितीतरी गोष्टींसाठी ग्रामस्थ, महिला व विद्यार्थ्यांना रेल्वे लाईन आपला जीव मुठीत धरून ओलांडावी लागते. तेव्हा लवकरात लवकर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करावे, संबंधित कंपनीने ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नये.
-प्रा. दीपक जाधव, उपसरपंच, देहरे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;