सर्वात मोठी बातमी! सलमान खानवर अल्पवयीन मुलाकडून गोळीबार करण्याचा कट; पोलिसांच्या चौकशीतून खळबळजनक माहिती उघड

सर्वात मोठी बातमी! सलमान खानवर अल्पवयीन मुलाकडून गोळीबार करण्याचा कट; पोलिसांच्या चौकशीतून खळबळजनक माहिती उघड

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. हेच नाही तर 14 एप्रिल 2024 रोजी सलमान खान याच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच हल्लेखोरांना अटक केली. सध्या सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. नुकताच पोलिसांकडून आता मोठी खळबळजनक माहिती सांगण्यात आलीये.

अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येणार होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आलीये. पनवेल पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब समोर आलीये. हेच नाही तर अत्याधुनिक बंदुकांचा वापर करून सलमानवर अल्पवयीन मुलाकडून गोळीबार करण्याचा कट रचण्यात आला होता.

हा गोळीबार करण्यासाठी बिश्नोई गॅंग अल्पवयीन मुलांचा वापर करणार असल्याचे समोर आले. आरोपींनी केलेल्या नियोजनानुसार सलमानवर हल्ला करुन पळून जाण्याचा प्लॅनही केला होता. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई हा त्यांना पळून जाण्यात पूर्ण मदत करणार होता असा देखील खुलासा करण्यात आलाय.

पनवेल पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर ही बाब उजेडात आली असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट उघडकीस आलाय. या सर्व कामात फक्त बिश्नोई गँग नाही तर कुख्यात गँगस्टर आनंद पाल याची हत्या झाल्यानंतर त्याची गॅंग चालवणारी मुलगी चिनू ही सुद्धा या सगळ्यात मदत करत असल्याचे समोर आलंय.

यावरून हे स्पष्ट होतंय की एक कट फसला की, लॉरेन्स बिश्नोईकडून दुसरा कट सलमान खानच्या हत्येसाठी आखला जातोय. यामुळे सलमान खानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. सलमान खान याच्या घरावर ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान या आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतच घरात होता.

हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोई याने म्हटले होते की, आपल्या जीवनाचे एकच उदिष्ट आहे ते म्हणजे सलमान खानची हत्या करणे. सलमान खान याच्या घराची रेकी देखील अनेकदा करण्यात आलीये. सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमान खानच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जातंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;