बालकलाकार आरंभी उबाळेने अनोख्या पद्धतीने लुटला उन्हाळी सुट्टीचा आनंद

बालकलाकार आरंभी उबाळेने अनोख्या पद्धतीने लुटला उन्हाळी सुट्टीचा आनंद

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी मजा, मस्ती आणि आनंदाचा काळ. कोणी विविध उपक्रमांत सहभाग घेतात आणि नवीन गोष्टी शिकतात. या काळात अनेक जण आपल्या आजी-आजोबांकडे किंवा गावाला जातात. असेच काहीसे बालकलाकार आनंदी उबाळे उन्हाळी सुट्टीचा पुरेपुर आनंद घेताना दिसत आहे. सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ या नव्या मालिकेतील बालकलाकार आरंभी उबाळे उर्फ बिट्टीने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे. यावेळेस bitti ने म्हणजेच सावली होईन सुखाची या सन मराठीवरील बालकलाकार आरंभी उबाळे हिने एका अनोख्या अंदाजात मे महिन्याचा सुट्टीचा आनंद लुटला आहे. आरंभींने आपल्या छोट्याशा हाताची कमाल करत बनवलेत क्यूट असे क्राफ्ट्स.

आरंभीला लहानपणापासूनच क्राफ्ट्स बनवण्याची आवड असल्यामुळे तिचा इवल्याशा हातांनी तिने अगदी सुंदर असे पिंकिश थीम मध्ये छोटे कागदाचे कप, बॅग, बॉक्सेस अशा गोष्टी बनवल्या आहेत. त्यामुळे खरचं बिट्टी ने जादू केलीय असे म्हणायला हरकत नाही. बीट्टी ने असच समर व्हेकेशन ची मज्जा घेत खरच आपल्याला दाखवून दिले आहे की वेगळ्या अंदाजाने देखील आपण उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करू शकतो. तर अशी रंगली आहे बिट्टी ची सुट्टी. त्यामुळे आरंभी लहान मुलांसाठी नक्कीच एक प्रेरणा ठरू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;