जामखेड तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत, पोलीस निरीक्षक रोखण्यात अपयशी

जामखेड तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत, पोलीस निरीक्षक रोखण्यात अपयशी

जामखेड तालुक्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. दिवसेंदिवस तालुक्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक महेश पाटील पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

दैनिक सामनाने अवैध धंद्यांबाबतची सत्य माहिती जनतेसमोर उजेडात आणली आणि मग पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना तालुक्यातील धंदे बंद आहेत असे जनतेला दाखविणे गरजेचे झाले. पण खरोखरच सर्व अवैध धंदे बंद केले तर मग या सर्वाच्या ‘हप्त्या’ पासून मिळणारे एवढे प्रचंड उत्पन्न बंद होणार ! त्यामुळे महेश पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांबरोबर एक नवे नाटक सुरू केले आहे. अवैध धंदेवाल्यांना फक्त दमदाटी करायची, त्याला धंदा बंद कर असे सांगायचे आणि पुन्हा आतून त्याला गुपचुप चालू ठेव असे पण सांगायचे. म्हणजेच महेश पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांना मारल्यासारखे करत आहेत आणि अवैध धंदेवाले ओरडल्यासारखे करीत आहेत.

मटका, जुगाराचे क्लब आणि बाजारच्या दिवशी झटपट मटका या अवैध धंद्यांना जामखेडमध्ये नुसता उत आलेला आहे आणि हे सर्व धंदे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना चोरून लपून का होईना जिवंत ठेवायचे आहेत. अवैध धंदे बंद झाले तर मग ‘हप्ता’ बंद होईल, मग एवढी शक्ती पणाला लावून आपण आपली बदली जामखेड पोलीस स्टेशनला करवून घेतली आहे, मग त्याचा उपयोग काय? महेश पाटील साहेबांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारी यावर नियंत्रण आणायचं सोडून बाजारपेठेतील व्यापारी, हॉटेलवाले, पानटपरीवाले यांनाच कायद्याचा बडगा दाखवून त्रास द्यायला सुरुवात केली आहे .

महेश पाटलांच काही चाललं नाही
जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे बंद आहेत, अशी ग्वाही दिली आहे. परंतु जामखेडमध्ये मात्र सर्व अवैध धंदे महेश पाटील यांच्या आशीर्वादाने बिनदिक्कत चालू आहेत. वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे त्यांची येथून उचलबांगडी केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही. त्यामुळे त्यांची तातडीने येथून बदली करण्याची मागणी जामखेडकरांच्या तोंडातून चर्चिली जात आहे.

जामखेड शहर व तालुक्यात मटका खुलेआम चालू आहे याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच सर्व मटका चालकांनी मटक्याचे आकडे फोनवर ऑनलाईन पद्धतीने घेतले जात आहे. असा मार्ग काढला असल्याची चर्चा मटका एजंटमध्ये आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;