शेअर बाजाराची घोडदौड; बाजार सुरू होताच निर्देशांकाची जबरदस्त उसळी,रचला नवा विक्रम
लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. या निवडणुकीच्या निकालांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये बाजारात चढउतार दिसून आले होते. या निवडणूक निकाल बाजार सकारात्मकतेने घेताना दिसत आहे. त्यामुळे निकालाच्या एक दिवस आधीच बाजाराने नवा विक्रम रचला आहे. आठवड्याचा पहिल्याच दिवशी बाजार सुरू होताच बाजाराने मोठी उसळी घेतली आहे. सकाळच्या प्री-ओपनिंग मार्केटमध्येच तेजी दिसून आली.
शेअर बाजारात निफ्टी, बँकनिफ्टी आणि सेन्सेक्स हे प्रमुख निर्देशांक चांगल्या मजबूत आणि बुलीश म्हणजेच तेजीत आहेत. ही तेजी सोमवारी सकाळच्या प्री-ओपिंग सेशनमध्येच आणखी वाढली. प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्सने 3051 अंकांची तर निफ्टीनेही 870 अंकांनी उसळी घेतली. ही तेजी शेअर बाजार चालू झाल्यावर ही कायम राहिली. पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स थेट 2200 पर्यंत उसळला. तर बाजार चालू होताच निफ्टीदेखील थेट 23,337.9 अंकापर्यंत वधारला. सेन्सेक्सने 76,738.89 अंकांचा ऐतिहासिक स्तर गाठल्याचे पाहायला मिळाले. सध्या हे दोन्ही निर्देशांक तेजीत आहेत. त्यामुळे सत्राच्या पहिल्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List