‘पंचायत 3’च्या सचिवजींची खऱ्या आयुष्यात किती संपत्ती? सीरिजसाठी घेतलं इतकं मानधन
प्राइम व्हिडीओवरील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'चा तिसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजमधील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आयआयटी खडगपूरचा माजी विद्यार्थी जितेंद्र कुमारला या सीरिजमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.
जितेंद्रला टीव्हीएफच्या युट्यूब व्हिडीओमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने 'पिचर्स' आणि 'कोटा फॅक्ट्री' या वेब सीरिजमध्ये काम केलं. जितेंद्रने 'शुभमंगल सावधान', 'ड्राय डे', 'चमन बहार' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
जितेंद्र कुमारचं मुंबईत एक घर आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये 88.18 लाख रुपयांची मर्सिडीज बेंज जीएलएस 350 डी, 82.10 लाख रुपयांची मर्सिडीज बेंज ई-क्लास, 48.43 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर आणि 42 लाख रुपयांची मिनी कंट्रीमॅन यांचा समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List