Hardik Pandya-Natasa Stankovic : घटस्फोटाची चर्चा असतानाच नताशाच एक मोठ पाऊल, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
सध्या सोशल मीडियावर नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. दोघांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट, फोटोंवर चाहत्यांच बारीक लक्ष आहे.
आतापर्यंत मागच्या दोन आयपीएलमध्ये नताशा स्टेनकोविक स्टेडियममध्ये हार्दिकसाठी चिअर करताना दिसली होती. पण यंदाच्या आयपीएलमध्ये नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही. सोशल मीडियावरही तिचे हार्दिक पांड्यासोबतचे फोटो गायब होते.
त्यामुळे दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा सुरु झाली. दोघे विभक्त होणार, घटस्फोटात नताशाला किती प्रॉपर्टी मिळणार यांची मीडियामध्ये खमंग चर्चा सुरु होती.
त्यात हार्दिक आणि नताशा दोघांनी मौन बाळगल्याने अशा चर्चा, बातम्यांनी अधिक जोर धरला. आता नताशा स्टेनकोविकने एक पाऊल उचललय. त्याने सगळ्या चाहत्यांच लक्ष वेधून घेतलय.
नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हार्दिक पांड्यासोबतचे सगळे फोटो रिस्टोर केले आहेत. यात व्हॅलेंटाइन्स डे चे सुद्धा फोटो आहेत.
नताशाच्या इन्स्टाग्रामवर हार्दिकसोबतचे फोटो पुन्हा दिसू लागले आहेत. त्यामुळे आता या घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो.
नताशाच्या या निर्णयामुळे या जोडप्याला मानणारे चाहते नक्कीच सुखावले असतील. पण तिने तिच्या सोशल मीडिया बायोमधून पांड्या सरनेम का हटवलं? फोटो का काढले? आणि पुन्हा का रिस्टोर केले? यामागची कारण अजून समजू शकलेली नाहीत.
नताशाने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमधून पांड्या सरनेम आणि हार्दिकसोबतचे फोटो हटवले, त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.










Comment List