पतीने मारलं, अन्याय झाला… अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने काढली बंदूक, केली ‘दादागिरी’

पतीने मारलं, अन्याय झाला… अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने काढली बंदूक, केली ‘दादागिरी’

अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. अभिनेत्री छाया कदम गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहेत. छाया यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण प्रत्येक सिनेमात त्यांना अन्याय सहन करणाऱ्या महिलेच्या भूमिका साकाराव्या लागल्या. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यावर छाया यांनी खंत व्यक्त करत, ‘मडगाव एक्स्प्रेस’ सिनेमात साकारलेल्या हटके भूमिकेबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छाया यांची चर्चा रंगली आहे.

नुकताच छाया यांनी  दिग्दर्शिका किरण राव हिच्या ‘लापता लेडीज‘ सिनेमात भूमिका साकारताना दिसल्या. सिनेमात त्यांची भूमिका छोटी होती, पण फार दमदार होती. त्यानंत त्यांनी ‘मडगाव एक्सप्रेस’ सिनेमात दादागिरी करताना दिसल्या. ज्यामुळे अभिनेत्रीला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली.

छाया म्हणाल्या, ‘प्रत्येक सिनेमांत माझी जी भूमिका असते, ती गरीब महिलेची असते. अशा भूमिका करून मी त्रासली आहे. मी गरीब आहे. माझा पती मला मारहाण करतो.. माझा पती गुंड आहे… सतत दारू पितो… प्रत्येक वेळी असंच होतं… पण आता काही तरी वेगळं घडलं आहे..’

‘मला दादागिरी करायची आहे. मला बंदूक घेऊन सर्वत्र फिरायचं आहे. मी कुणाला याला म्हणाली देखील, इतक्या वर्षांची मी आता भडास काढणार आहे. फक्त बंदूकच नाही तर, दागिने, साडीमध्ये कुणाल याने माझा लूक पूर्ण केला.’ असं म्हणत छाया कदम यांनी आनंद व्यक्त केला.

‘मडगाव एक्सप्रेस’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा विनोदी आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अभिनेता आणि दिर्गर्शक कुणाल खेमू याने केलं आहे. कुणाल याने सिनेमात छाया यांना हटके भूमिका दिली आहे. सिनेमा चाहत्यांना देखील प्रचंड आवडला.
सिनेमात छाया यांच्यासोबत दिव्येंदु, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी, नोरा फतेही, उपेंद्र लिमये यांची देखील मुख्य भूमिका आहे.

छाया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. नुकताच झालेल्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये देखील त्यांनी हजेरी लावली होती.

छाया कदम यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘लापता लेडीज’, ‘फ्रँड्री’, ‘सैराट’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘न्यूड’, ‘येरे येरे पावसा’, ‘हंपी’ यांसारख्या अनेक सिनेमामध्ये काम केलं आहे. सिनेमांमध्ये छाया यांनी भूमिका छोटी असली तरी चाहत्यांच्या लक्षात राहाणारी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;