मुंबई स्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून कोल्हापुरात खळबळ; ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने मारहाण

मुंबई स्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून कोल्हापुरात खळबळ; ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने मारहाण

गांजा सापडल्याच्या घटनेनंतर गेल्या महिनाभरापासून शेकडोंच्या संख्येने मोबाईलही सापडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अगोदरच सुरक्षेचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या गुन्हेगारीने आता डोके वर काढले आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास अंघोळीसाठी हौदावर आलेल्या मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता (वय 70) या कैद्याचा ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. मनोजकुमार हा मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी होता.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मनोजकुमार गुप्ता हा कैदी कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याच्या खुनाचे कारण समजले नसले तरी सुपारी घेऊनच या कारागृहात शिक्षा भोगणाऱया एका कैद्यांच्या टोळक्याने हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

दरम्यान, न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाचजणांनी हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. या पाचजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमधील दोघेजण मोक्कातील आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे.

कळंबा जेलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

n कारागृहात गांजा सापडण्यासह कारागृहातील पोलीस कैद्यांना गांजा पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पाठोपाठ कारागृहात मोबाईलही सापडू लागले आहेत. गेल्या दीड-दोन महिन्यांत कळंबा जेलच्या झडतीत शंभरच्या घरात मोबाईल सापडले. कारागृहातील अंडासेलमध्येही मोबाईल आढळला होता, शिवाय कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे तुरुंग अधीक्षकांची तडकाफडकी बदली करीत येथे श्यामकांत शेडगे यांच्याकडे अधीक्षकपदाचा कार्यभार देण्यात आला होता. त्यानंतर शेडगे यांनी पाठविलेल्या अहवालानुसार दोन वरिष्ठ अधिकारी आणि 9 कर्मचाऱयांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी एप्रिल महिन्यात दोन अधिकाऱयांसह 9 कर्मचाऱयांना सेवेतून बडतर्फ केले आहे; तसेच दोन वरिष्ठ अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;