लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

राजस्थानवरून लग्नाचे वऱ्हाड घेऊन मध्य प्रदेशमधील राजगढ येथे निघालेली एक ट्रॅक्टर- ट्रॉली उलटली असून या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

राजस्थानमधील मोतीपूरा येथील रहिवासी असलेले हे प्रवासी एका लग्नासाठी मध्य प्रदेशमधील राजगढ येथील कुलामपूर येथे जात होते. रविवारी रात्री मध्य प्रदेशमधील पिपलोडी येथे या प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर- ट्रॉली पलटली असून या अपघातात 13 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तब्बल 40 ते 50 लोकं प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा जास्त लोकं प्रवास करत असल्यामुळे तसेच चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी उलटली. गाडी उलटल्यानंतर सर्व प्रवासी या ट्रॉली खाली दबले गेले होते. बचाव पथक व पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रॉली हटवण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;