भोसरीत बांगलादेशी नागरिकाने केले मतदान; पासपोर्ट काढून बांगलादेश वारी

भोसरीत बांगलादेशी नागरिकाने केले मतदान; पासपोर्ट काढून बांगलादेश वारी

पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी पथकाने भोसरीत जेरबंद केलेल्या बांगलादेशी घुसखोरांपैकी एकाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघासाठी मतदान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर त्याने 2019 मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही मतदान केल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्याच्यासह आणखी एकाने पासपोर्टचा वापर करून विमानाने बांगलादेशची वारी केल्याचेही निष्पन्न झाले आहे.

शामीम नुरोल राणा (वय 26, रा जमलपूर, ढाका, बांगलादेश) असे घुसखोरी करणाऱया बांगलादेशीचे नाव आहे. दहशत विरोधी पथकाने 25 मे रोजी भोसरीतील शांतीनगर येथे छापा टाकून शामीम याच्यासह राज उर्फ सम्राट सधन अधिकारी (वय 27), जलील नुरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार (वय 38), वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीजऊल हक हिरा (वय 26), आझाद शमशुल शेख उर्फ मोहंमद अबुल कलाम शमशुद्दिन फकीर (वय 32) या पाच बांगलादेशी घुसखोरांना जेरबंद केले होते. हिंदुस्थानात घुसखोरी केल्यानंतर शामीम पुण्यात आला. सुरूवातीला काही दिवस हडपसर येथे राहत होता. गेल्या आठ वर्षापासून तो भोसरीत वास्तव्यास आहे. त्यानंतर त्याचे इतर साथीदारही भोसरीत आले.

शामीम हा आठ वर्षापासून भोसरीत राहत आहे. त्याने 2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 13 मे रोजी भोसरीत मतदान केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, शामीम व जलील यांच्याकडे पासपोर्ट असून, दोघेजण विमानाने बांगलादेशलाही जाऊन आले आहेत. त्यांना दोन जणांनी बनावट कागदपत्रे बनवून दिली आहेत. त्यांचाही कसून शोध सूरू आहे. लवकरच ते आरोपीही ताब्यात येतील.
– अशोक केंद्रे, (पोलीस उपनिरीक्षक)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;