मलायकासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरच्या पोस्टची चर्चा

मलायकासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरच्या पोस्टची चर्चा

मलायकासोबत ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरच्या पोस्टची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांदरम्यान अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. एकीकडे मलायकाच्या मॅनेजरने ब्रेकअपच्या चर्चा फेटाळल्या आहेत. तर दुसरीकडे अर्जुनने भूतकाळ आणि भविष्याविषयी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा या दोघांचं नातं चर्चेत आलं आहे. अर्जुन आणि मलायका ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक आहे. अर्जुन मलायकापेक्षा वयाने फार लहान असल्याने अनेकदा त्यांना ट्रोलसुद्धा केलं गेलंय.

अर्जुन कपूरची पोस्ट-

शनिवारी अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. ‘आपल्याकडे आयुष्यात दोन पर्याय असतात. आपण आपल्या भूतकाळाचे कैदी होऊ शकतो किंवा भविष्यातील शक्यतांचा शोध घेणारे बनू शकतो’, अशा आशयाची ही पोस्ट आहे. मलायका आणि अर्जुनने 2018 मध्ये त्यांच्या नात्याला जाहीरपणे कबुली दिली होती. मलायकाच्या 45 व्या वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अर्जुनने प्रेम व्यक्त केलं होतं.

ब्रेकअपच्या चर्चांवर मलायकाच्या मॅनेजरचं उत्तर

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मलायकाच्या मॅनेजरने सांगितलं, “नाही नाही, या सर्व केवळ चर्चा आहे. त्या दोघांचं ब्रेकअप झालेल नाही.” मलायका आणि अर्जुनच्या जवळच्या व्यक्तीने एका मुलाखतीत त्यांच्या ब्रेकअपचा खुलासा केला होता. तेव्हापासून या दोघांच्या नात्याविषयी चर्चांना उधाण आलं होतं. ‘मलायका आणि अर्जुन यांचे मार्ग जरी वेगळे झाले तरी ते याबाबत एकमेकांवर कधीच आरोप करणार नाहीत. ते त्यांच्या नात्याचा कायम आदर करतील’, असं त्या जवळच्या व्यक्तीने ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

मलायकाने अभिनेता अरबाज खानशी लग्न केलं होतं. 19 वर्षांच्या संसारानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. अर्जुनसोबतच्या नात्यामुळे मलायका अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;