Video : अभिनेत्री रविना टंडनच्या कारने वृद्ध महिलेला उडवले; लोकांनी घेरले, नशेच्या धुंदीत मारहाण केल्याचा आरोप

Video : अभिनेत्री रविना टंडनच्या कारने वृद्ध महिलेला उडवले; लोकांनी घेरले, नशेच्या धुंदीत मारहाण केल्याचा आरोप

मुंबईतील वांद्रे भागात शनिवारी रात्री बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिच्या कारने वृद्ध महिलेला उडवले. चालकाने बेदरकारपणे वाहन चालवल्याने हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अपघातानंतर रविना टंडन हिला स्थानिक लोकांनी घेरल्याचे दिसतेय. यावेळी रविना ‘कृपया मला मारू नका’, अशी विनवणी करतानाही दिसतेय.

प्राथमिक माहितीनुसार, रविना टंडन हिच्या चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत रिझवी कॉलेज जवळील क्वार्टर रोडवर तिघांना उडवले. यात एका वृद्ध महिलेचाही समावेश आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तिला जाब विचारला. यामुळे संतापलेली रविना नशेच्या धुंदीत कारमधून उतरली आणि पीडितांना शिवीगाळ, मारहाण करते, असा आरोप करण्यात आला आहे.

व्हिडीओत काय दिसतेय?

व्हायरल व्हिडीओत पीडित आई स्थानिक लोक रविना टंडन हिला घेरल्याचे आई पोलिसांना बोलावत असल्याचे दिसते. यात एक पीडित व्यक्ती रविनाला म्हणतो की, तुला रात्र तुरुंगात घालवावी लागेल, माझे नाक रक्तबंबाळ झाले आहे. तर दुसरीकडे रविना लोकांना व्हिडिओ रेकॉर्ड न करण्याची विनवणी करते. तसेच स्थानिक लोक अंगावर धावून येताच, कृपया मला धक्क देऊ नका. मारहाण करू नका, असे म्हणताना दिसतेय.

पीडित व्यक्तीचा आरोप

या प्रकरणी मोहम्मद नावाचा व्यक्ती पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करतो, मात्र पोलीस आपल्याला जुमानत नसल्याचा आरोप त्याने केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची 70 वर्षांची आई, बहीण आणि भाची रस्त्याने जात असताना रविना टंडन हिच्या कारची त्यांना धडक बसते. याचा जाब विचारला तर चालक अरेरावी करू लागला. तसेच रविनाही कारमधून उतरून शिवीगाळ आणि मारहाण करते.

पोलीस कारवाई करणार?

दरम्यान, या प्रकरणावर रविना टंडन किंवा तिच्या प्रतिनिधीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस तपास करत असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;