भावासमोरच आरती सिंहने पतीसोबत केले थेट ‘हे’ कृत्य, तो व्हिडीओ तूफान व्हायरल, लोकांचा संताप, म्हणाले..

भावासमोरच आरती सिंहने पतीसोबत केले थेट ‘हे’ कृत्य, तो व्हिडीओ तूफान व्हायरल, लोकांचा संताप, म्हणाले..

अभिनेत्री आरती सिंह हिने 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईत बिझनेसमॅन दीपक चौहान याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे आरती सिंह हिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. हेच नाही तर लग्नात आरती सिंह धमाल करताना दिसली. जवळपास सर्वच कलाकार हे आरती सिंहच्या लग्नाला पोहचले होते. मागील वाद विसरून अभिनेता गोविंदा देखील भाची आरतीच्या लग्नाला पोहचला. आरती सिंह नेहमीच चर्चेत असते. आरती सिंह सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.

आरती सिंह ही सध्या पतीसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. सतत सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील आरती सिंह दिसत आहे. नुकताच आरती सिंह हिने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओनंतर लोक हे आरती सिंह हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. आरती सिंहचा हा व्हिडीओ लोकांना अजिबातच आवडला नाहीये.

आरती सिंह हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती फुल मस्ती करताना दिसतंय. स्विमिंग पूलमध्ये भाऊ कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह आणि पतीसोबत मस्ती करताना आरती सिंह दिसतंय. यासोबतच इतरही बरेच लोक यावेळी दिसत आहेत. कुटुंबासोबत धमाल करताना आरती दिसत आहे. मात्र, लोकांना आरती सिंहचे वागणे अजिबात आवडले नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arti singh sharma (@artisingh5)

स्विमिंग पूलमध्ये पतीसोबत रोमांटिक होताना आरती सिंह दिसत आहे. हेच नाही तर यावेळी जांभळ्या रंगाच्या बिकिनीवर आरती सिंह दिसत आहे. भावासमोर असे कपडे घालणे शोभते का? असे म्हणत लोक आरती सिंहला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. हेच नाही तर आपण भारतामध्ये राहतो हे सांगतानाही काही लोक आरतीला दिसत आहेत.

एकाने म्हटले की, भावासमोर असे कपडे घालून ही कशी फिरू शकते? दुसऱ्याने लिहिले की, लग्नानंतर आरती सिंह खूपच बदलली आहे. लोकांना आरती सिंहचा हा व्हिडीओ अजिबातच आवडत नाहीये. लोक या व्हिडीओनंतर आरती सिंहवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आरती सिंह ही बिग बाॅसमध्ये धमाका करताना दिसली होती. आरती सिंह सोशल मीडियावर सक्रिय असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;