मतमोजणीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना करावा लागणार क्यू आर कोड स्कॅन; रत्नागिरी पोलिसांचा हायटेक बंदोबस्त

मतमोजणीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना करावा लागणार क्यू आर कोड स्कॅन; रत्नागिरी पोलिसांचा हायटेक बंदोबस्त

मंगळवारी 4 जून रोजी लोकसभा निवडणूकीची मतमोजणी होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मिरजोळे एमआयडीसी मधील भारतीय अन्न गोदामात मतमोजणी होणार आहे. दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार समोरासमोर येऊन वाद निर्माण होऊ नयेत याकरिता पोलिसांनी राजकीय पक्षांसाठी स्वतंत्र जागा नेमून दिल्या आहेत. हा बंदोबस्त करताना पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.मतमोजणीच्या ठिकाणी जाताना राजकीय कार्यकर्त्याला क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. क्यू आर कोड स्कॅन केल्यावर मॅपच्या सहाय्याने कार्यकर्त्याला मतमोजणी करीता जाता येणार आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीसाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गर्दी करतात. अशावेळी प्रतिस्पर्धी कार्यकर्ते समोरासमोर येऊन वादाचे प्रसंग घडतात. हे प्रसंग टाळण्यासाठी पोलिसांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी यश हॉटेल समोर अनंत भाटकर यांच्या घरासमोरील मोकळा परिसर नेमून दिला आहे. महायुतीसाठी कोकण रेल्वेच्या विभागीय कार्यालयासमोरील जीएफ कंपनीची मोकळी जागा, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, वंचित आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसाठी श्री सिध्दीविनायक लाँड्री सर्व्हिसेस समोरील मोकळी जागा नेमून देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना सोबत मोबाईल, हत्यार, सिगारेट, लायटर आणि धुम्रपानाच्या वस्तू नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी नेमून दिलेल्या जागेवर कार्यकर्त्याला पोहचण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पोलिसांनी तीन क्यू आर कोड तयार केले आहेत. महाविकास आघाडी, महायुती आणि अन्य पक्षाचे उमेदवारांसाठी प्रत्येकी एक क्यू आर कोड तयार करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांना हा क्यू आर कोड स्कॅन करावा लागणार आहे. हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर मॅपच्या सहाय्याने कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षाला नेमून दिलेल्या जागेवर पोहचता येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;