कोपरगाव कारागृहातील आरोपीने उपचारासाठी नेत असताना केला पोबारा; पोलिसांची नाचक्की

कोपरगाव कारागृहातील आरोपीने उपचारासाठी नेत असताना केला पोबारा; पोलिसांची नाचक्की

शिर्डीतील सागर शेजवळ खुनप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेत असताना आरोपी दुचाकीवरून उडी मारून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोपरगाव येथील कारागृहातील मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, 2015 साली शिर्डीत बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजली म्हणून सागर शेजवळ या दलित तरुणाची हत्या करण्यात आली होती. शिर्डी इथल्या बिअर बारमध्ये 16 मे 2015 रोजी ही घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. यातील नऊ आरोपींपैकी योगेश सर्जेराव उर्फ गोट्या पारधे (रा. कोल्हार, ता.राहाता, जि. नगर) हा एक आरोपी आहे. या गुन्हयातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायलय कोपरगाव यांचेकडील सेशन केस नंबर ६२/२०१५ मधील न्यायालयीन कोठडीमध्ये येथील कारागृहात जेरबंद होता. त्याने रक्ताची उलटी झाली व छातीत दुखत असल्याचे सांगत रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती पोलिसांना केली.

आरोपीला दुय्यम कारागृह कोपरगाव येथून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव नेत असताना वाबळे हॉस्पीटलजवळील टी पॉईटवर दुचाकीवाहनाचा वेग कमी झाला असता आरोपीने दुचाकी वाहनावरुन उडी मारुन पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला. आरोपीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्याबाबत ड्युटी पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांची कुठलीही परवानगी घेतली नव्हती. ते स्वतःच्या जबाबदारीवर दोन आरोपींना बाहेर घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. दोन आरोपी व पोलीस असे तिघेजण मोटरसायकलवर जाताना या आरोपींना बेड्या घातल्या नव्हत्या. एक आरोपी पळून गेल्यानंतर दुसऱ्या आरोपीच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल पिनू ढाकणे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे व पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा पुढील तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;